आनंदाची बातमी,राज्यात 23 हजार 628 जागांसाठी पोलीसांची भरती होणार,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा! Maharashtra Police Bharti 2023

Spread the love

Maharashtra Police Bharti 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात गृह विभागाच्या मार्फत पोलिस भरतीसाठी नवीन आकृतीबंध तयार केला जाणार आहे.त्यामुळे येत्या काळात पोलिस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विधानपरिषदेत पोलिस भरतीबाबत एक लक्षवेधी सूचना मांडली होती.या सूचनेला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले की राज्यात लवकरच 23 हजार 628 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.या लक्षवेधी सुचनेच्या चर्चेत आमदार भाई जगताप यांनी देखील आपला सहभाग नोंदविला होता.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 23 हजार पोलिस पदांची भरती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात आतापर्यंत एकाच वेळी 8 हजार 400 पोलिस शिपायांसाठी पोलिस प्रशिक्षण देण्याची क्षमता होती.परंतु आता नवीन आकृतीबंध तयार करून हीच क्षमता वाढविली जाणार आहे.तसेच यासाठी राज्य सरकारच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे पण वाचा:- आयकर विभागात १०वी १२वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी,कुठलीही परीक्षा नाही!

पोलिस भरती प्रक्रियेकरिता नवीन आकृतीबंध तयार करताना सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक हजार लोकांना प्रशिक्षित केले जाणार आहे.तसेच लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन,कर्मचारी, युनिट असेल पाहिजे याबाबत देखील नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment