MSP Price 2023:- केंद्र सरकारचा मोठा निर्णय,दिवाळीत शेतकरी होणार मालामाल,जाणून घ्या कसे?

Spread the love

MSP Price 2023

MSP Price 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने १८ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी रब्बी पिकांच्या तब्बल सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये गहू,मोहरी,बार्ली, हरभरा,मसूर आणि करडई या पिकांचा समावेश आहे.त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांची प्रती क्विंटल 2 ते 7 टक्के वाढीव दराने खरेदी केली जाणार आहे.

किती रुपयांची वाढ झाली?
MSP Price 2023

पिकांचे नाव MSP 2022-23 ₹Per/QtMSP 2023-24 ₹Per/Qtझालेली वाढ
१.गहू21252275150
२.मोहरी54505650200
३.बार्ली17351850115
४.हरभरा53355440105
५.मसूर64256000425
६.करडई56505800150

हे पण वाचा:- आता आयुष्मान भारत वार्ड काढा 5 मिनिटात तेही घरबसल्या

मोहरी आणि मसुरच्या MSP मध्ये सर्वाधिक वाढ

केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीमध्ये मध्ये मोहरी आणि मसुरच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे.मोहरीच्या किमतीत प्रती क्विंटल 200 रुपयांची आणि मसुरच्या किमतीत प्रती क्विंटल 425 रुपयांची वाढ केली आहे.गव्हाच्या किमतीत प्रती क्विंटल 150 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे.MSP Price 2023

बार्ली आणि हरभरा यांच्या किमतीत प्रती क्विंटल अनुक्रमे 115 रुपये आणि 105 रुपयाने वाढ झाली आहे.त्याचबरोबर करडईच्या किमान आधारभूत किंमतीत 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असणार आहे.यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment