MSRTC News :- आता कोणतीही एसटी बस कुठे आहे? याचे लोकेशन कळणार तुमच्या मोबाईल वरून तेही फक्त 2 मिनिटांत!

Spread the love

MSRTC News
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची योजना सुरू केलेली आहे.तसेच राज्यातील महिलांसाठी कोणत्याही एसटी बसने प्रवास करण्यासाठी तिकिटावर ५० टक्के सूट दिली जात आहे. यामुळे एसटीने प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

महामंडळाच्या माध्यमातून एक नवीन सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे.या सुविधेच्या माध्यमातून एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपली बस सध्या कुठे याची माहिती मिळणार आहे. म्हणजेच एसटी बसचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे.MSRTC News

ही सुविधा राज्यातील सर्व नागरिकांसाठी अगदी मोफत सुरू करण्यात येणार आहे.त्यामुळे कोणताही नागरिक कोणत्याही एसटी बसचे लाईव्ह लोकेशन घरबसल्या पाहू शकणार आहे.त्यासाठी एस टी महामंडळातर्फे एक मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले जाणार आहे.या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एसटी बस कुठे आहे ते कळणार आहे.msrtc pass online

हे पण वाचा:- राज्यातील या नागरिकांचा मोफत बस प्रवास बंद,आता मोफत प्रवासाऐवजी मिळणार पैसे,जाणून घ्या सविस्तर माहिती!

एसटी महामंडळाने प्रायोगिक तत्वावर या सुविधेची सुरुवात संभाजीनगर या विभागात केली आहे.संभाजीनगर विभागातून धावणाऱ्या विविध मार्गावर धावणाऱ्या ५०० एसटी बसेस मध्ये या ॲप्लिकेशनची सुविधा बसविण्यात आली आहे.परंतु सध्या संभाजीनगर एसटी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.MSRTC Bus App in Marathi

हे पण वाचा:- गुडन्यूज, जमिनींच्या नकाशावर दिसणार जमिनींची सरकारी किंमत (रेडीरेकनर) तेही एका क्लिकवर,पहा कधी पासून होणार सुरुवात!

त्यामुळे मित्रांनो सध्या ही सुविधा फक्त अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला देण्यात आली असली तरी देखील लवकरच या सुविधेमध्ये योग्य ते बदल करून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.तज्ञांच्या मार्गदर्शनाने हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहे.msrtc pass online

सदर मोबाईल ॲप्लिकेशनची सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू झाल्यास नागरिकांना घरबसल्या एसटीचे लाईव्ह लोकेशन कळणार आहे.त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.कोणत्याही एसटीची वाट बघत ताटकळत थांबावे लागणार नाही.

हे पण वाचा:- नोकरीच्या शोधात आहात? या पोर्टलवर नोंदणी करा तब्बल 10.45 लाख रिक्त पदे तुमची वाट पाहत आहेत,मग वाट कसली पाहताय आजच नोंदणी करा!

याचबरोबर एसटी महमंडळाकडून डिजिटल तिकीट सुविधा सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे आता प्रवाशांना एटीएम, डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड,गूगल पे,फोन पे, क्यूआर कोडचा वापर करून ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment