नोकरीच्या शोधात आहात? या पोर्टलवर नोंदणी करा तब्बल 10.45 लाख रिक्त पदे तुमची वाट पाहत आहेत,मग वाट कसली पाहताय आजच नोंदणी करा!NCS Portal Employment

Spread the love

NCS Portal Employment
देशातील नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरी शोधणे आणि योग्य नोकरी मिळणे,करियरविषयक मार्गदर्शक सल्ला,व्यावसायिक मार्गदर्शन,कौशल्य विकास अभ्यासक्रमांविषयी माहिती इत्यादी करियरशी संबंधित विविध सेवा डिजिटल मंचाच्या माध्यमातून उपलब्ध करून देता याव्या म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय करियर सेवा (एनसीएस) पोर्टल [www.ncs.gov.in] सुरु केले आहे.

योग्य व्यक्तीला योग्य पदावरील नोकरी मिळावी या हेतूने एनसीएस पोर्टल नोकरीच्या शोधात असणारे आणि नोकऱ्या देणारे यांना एका मंचावर घेऊन येते,देशातील आकांक्षित युवकांना नोकरीच्या सन्माननीय संधी उपलब्ध करून देते आणि करियर विकासासाठी मदत उपलब्ध करून देते.

एनसीएस पोर्टलची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत
NCS Portal Employment

१.नोकरी शोधणाऱ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी 1100 हून अधिक मान्यताप्राप्त करियर सल्लागार

२.3600 हून अधिक प्रकारच्या नोकऱ्यांबाबत करियरची माहिती देणारा माहितीकोष

३.रोजगारविषयक पात्रतेच्या चाचणीसाठी ऑनलाइन रोजगार पात्रता कौशल्य मूल्यमापन

४.डिजिटल आणि इतर सॉफ्ट स्किल्स साठी ऑनलाइन रोजगार पात्रता सुधारण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाची सुविधा

५.नोकरीच्या शोधात असणाऱ्यांची माहिती सामायिक करण्यासाठी 28 राज्यांच्या (एनसीएसचा थेट वापर करणाऱ्या 7 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह) रोजगार पोर्टल्सचे एकत्रीकरण

६.रिक्त पदांच्या सामायीकीकरणा साठी विविध खासगी रोजगार पोर्टल्सशी एकत्रीकरण

७.नियोक्त्यांचे ऑटो रजिस्टरिंग करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे उद्यम पोर्टल, ईपीएफओ आणि ईएसआयसी यांच्यासह एकत्रीकरण

हे पण वाचा:- १०वी पास उमेदवारांना महानगरपालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आजच आपला अर्ज करा!

दिनांक 18.12.2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार, एनसीएस पोर्टलवर 10.45 लाखांहून अधिक रिक्त पदे उपलब्ध आहेत. गेल्या तीन वर्षांत नोंदणी झालेले नियोक्ते आणि रिक्त पदे यांचे वर्षनिहाय तपशील खाली दिले आहेत

सन २०२२-२१ साली ७३,३६७ उमेदवारांनी आपली एनसीएस पोर्टलवर नोंदणी केली.त्या वर्षी १२,६१,०६६ रिक्त पदे पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. सन २०२१-२२ साली ५२,८६३ उमेदवारांनी नोंदणी केली त्या वर्षी १३,४६,७६५ रिक्त पदे उपलब्ध होती.सन २०२२-२३ या वर्षी ८,१९,८२७ उमेदवारांनी आपली नोंदणी केली त्यावर्षी ३४,८१,९४४ रिक्त पदे एनसीएस पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली होती. केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment