Nirdhur Chul Yojana
शासनकडून उज्ज्वला योजनेतून गरीब कुटुंबाना मोफत गॅस दिल्यानंतर आता शासनाकडून निर्धार चूल देण्यात येणार आहे.यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
सतत वाढणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे महिला पुन्हा चुलीकडे वळत आहे.चुलीवर जेवण बनवताना धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकल्यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धार चूल वाटप योजना सुरू केली आहे.
ही योजना महाप्रीतद्वारे सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
हे पण वाचा:- कडबा कुट्टी मशीन साठी मिळणार १०० टक्के अनुदान,असा करा ऑनलाईन अर्ज!
या योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाना मोफत निर्धार चुलीचे वाटप करण्यात येत आहे.समाज कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
Nirdhur Chul Yojana
•अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी.
•ही योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठीच राबविली जात आहे.
•अर्जदार व्यक्तीकडे घरगुती गॅसचे कनेक्शन नसावे.
•यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे
•अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
•रेशन कार्ड
•रहिवासी दाखला
•मोबाईल क्रमांक
•ई मेल आयडी
•अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
•यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे तसेच गॅस वापरत नसल्याचे शपथपत्र.
अर्ज कुठे करायचा?
Nirdhur Chul Yojana
या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.यासाठी शासनाच्या https://mahadiwa.vercel.app/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या वेबसाईट वर गेल्यानंतर आवश्यक ती माहिती भरून दहा मिनिटात अर्ज करता येणार आहे.तसेच आपल्याकडील मोबाईल वरून देखील सोप्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे.अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागातील जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.