पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची यादी जाहीर,यादीत नाव नसेल तर नाही मिळणार लाभ,असे चेक करा आपले नाव!PM Kisan 16th Installment List

Spread the love

PM Kisan 16th Installment List
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून देशातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये 2000 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जातात.शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना प्रती शेतकरी 30,000 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.म्हणजेच आत्तापर्यंत एकूण 15 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.चुकीच्या मार्गांचा वापर करून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यामुळे चाप बसला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर २०२३ रोजी शेतकऱ्यांना १५व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते.आता नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणुन शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात १६ व्या हप्त्याचे वितरण केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

हे पण वाचा:- या नागरिकांना विनातारण 3 लाख रुपयांपर्यंत वार्षिक फक्त 5 टक्के व्याज दराने मिळणार कर्ज,अर्ज नोंदणी सुरू,पहा कोण आहेत पात्र?

या योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.ही यादी पाहण्यासाठी pmkisan.gov.in ya वेबसाईट पोर्टलवर भेट द्यावी लागेल.

तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही असे करा चेक
PM kisan 16th Installment List

  • तुमच्या मोबाईलवरून pmkisan.gov.in या पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर Beneficiary List हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.
  • पुढे तुमचा जिल्हा,तुमचा तालुका आणि तुमचे गाव निवडायचे आहे.
  • शेवटी Get Report या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी तुम्हाला दिसणार आहे.
  • त्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव चेक करू शकणार आहेत.

तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपले नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत चेक करू शकणार आहेत.तसेच पी एम किसान योजनेसाठी पात्र असणाऱ्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांना आता नव्याने नोंदणी करता येणार आहे.त्यासाठी आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आपली नोंदणी करायची आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment