या नागरिकांना विनातारण 3 लाख रुपयांपर्यंत वार्षिक फक्त 5 टक्के व्याज दराने मिळणार कर्ज,अर्ज नोंदणी सुरू,पहा कोण आहेत पात्र? PM Vishwakarma Yojana

Spread the love

PM Vishwakarma Yojana
केंद्र शासनाने पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्याोग-व्यवसायास स्थैर्य मिळण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे.या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी पारंपरिक बलुतेदार कारागिरांना ५ टक्के व्याजदरात विनातारण ३ लाखांपर्यंत दोन टप्प्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून,या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांनी सामान्य सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करावी लागणार आहे.

ग्रामीण आणि शहरी पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्याोगास स्थैर्य निर्माण करणे,त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक मदत,ब्रँड प्रचार आणि उद्याोगांशी जोडले जाण्यासाठी व्यासपीठ तयार करणे यासाठी केंद्र शासनाच्या सुक्ष्म,लघु व मध्यम उद्याोग मंत्रालयाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे.

प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना ५ दिवसीय मुलभूत प्रशिक्षण आणि १५ दिवसीय कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, प्रशिक्षण कालावधीत पाचशे रुपये प्रतिदिन विद्यावेतन दिले जाणार आहे.प्रशिक्षणानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र प्रदान केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना साहित्यासाठी १५ हजार रुपये दिले जाणार आहेत.

हे पण वाचा:- बियर बार सुरू करण्यासाठी लायसन्स कसे काढावे?त्यासाठी अर्ज कुठे करायचा?किती खर्च येतो?जाणून घ्या संपूर्ण माहिती!

कोण कोण असणार पात्र?
PM Vishwakarma Yojana

(i)सुतार
(ii)होडी बांधणी कारागीर
(iii)चिलखत बनवणारे
(iv)लोहार
(v)हातोडी आणि अवजार संच बनवणारे
(vi)कुलूप बनवणारे
(vii)सोनार
(viii)कुंभार
(ix)शिल्पकार (मूर्तिकार,दगडी कोरीव काम),पाथरवट (दगड फोडणारे)
(x)चर्मकार (पादत्राणे कारागीर)
(xi)मेस्त्री
(xii)टोपल्या/चटया/झाडू/कॉयर साहित्य कारागीर
(xiii)बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे
(xiv)न्हावी (केश कर्तनकार)
(xv)फुलांचे हार बनवणारे कारागीर
(xvi)परीट (धोबी)
(xvii)शिंपी आणि
(xviii)मासेमारीचे जाळे विणणारे

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

१.आधार कार्ड
२.पॅन कार्ड
३.जन्म तारखेचा पुरावा किंवा हस्तांतरण प्रमाणपत्र ४.जातीचे प्रमाणपत्र
५.शिधापत्रिका (रेशन कार्ड)
६.पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
७.बँकेचे पासबुक
८.आधारकार्ड संलग्न मोबाईल नंबर

अर्ज कुठे करायचा?

केंद्र सरकारच्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील बारा बलुतेदार कारागिरांना पीएम विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन करावी लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment