PM Kisan Mandhan Yojana
PM Kisan Mandhan Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी 2019 पासून पी एम किसान मानधन योजना राबविली जात आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
Table of Contents
काय आहे पीएम किसान मानधन योजना?
What Is PM Kisan Mandhan Yojana
पी एम किसान मानधन योजनेच्या माध्यमातून 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे.शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याच्या पत्नीला निवृत्ती वेतन म्हणून 50% पेन्शन मिळणार आहे.ही पेन्शन शेतकऱ्याच्या मृत्यू पश्चात फक्त त्याच्या पत्नीलाच मिळणार आहे.
योजनेच्या अटी आणि शर्थी
१.योजनेमध्ये फक्त 18 ते 40 वयोगटातीलच शेतकरी सहभागी होऊ शकतात.
२.शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असल्यास सहभागी होता येणार नाही.
३. शेतकऱ्याला या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये योगदान द्यावे लागेल.
४.शेतकऱ्याला वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आवश्यक पात्रता
Eligibility Criteria For PM Kisan Mandhan Yojana
१.योजना फक्त लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे.
२.फक्त 18 ते 40 वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात.
३.संबंधित राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात जमिनीच्या नोंदीनुसार 2 हेक्टर पर्यंत लागवडीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
खालील वर्गवारी असलेले शेतकरी पात्र नसतील
१.राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, विमा महामंडळ योजना,निधी संस्था योजना यांसारख्या इतर कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले कर्मचारी या योजनेत सहभागी होऊ शकत नाहीत.
२.श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि प्रधानमंत्री व्यापारी मानधन योजनेचे लाभार्थी असलेले शेतकरी देखील या योजनेत सहभागी होऊ शकणार नाहीत.
३.राज्यसभा,लोकसभा,विधानसभा आणि विधान परिषदचे माजी व वर्तमान सदस्य आणि महानगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समितीचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष देखील सहभागी होऊ शकणार नाहीत.
४.केंद्र सरकार,राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था मधील वर्तमान आणि सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेत सहभागी होऊ शकणार नाहीत.
५.आयकर भरणाऱ्या व्यक्ती तसेच डॉक्टर,वकील, इंजिनिअर,चार्टर्ड अकाऊंटंट आणि वास्तुविशारद यांसारखे व्यवसायिक जे व्यावसायिक संस्थांमध्ये नोंदणीकृत आहेत.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी मिळणार विनातरण कर्ज
आवश्यक कागदपत्रे
१.आधार कार्ड
२.बचत बँक खाते/पीएम किसानचे लाभार्थी
योजनेत सहभागी कसे व्हायचे?
या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन फॉर्म भरावा लागेल.त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक ज्यावर IFSC कोड असावा हे दस्तऐवज सोबत घेऊन जावे लागेल.
पीएम किसान मानधन योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.