Post Office Time Deposite Scheme:- पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा,आणि 114 महिन्यात दुप्पट रक्कम मिळवा!

Spread the love

Post Office Time Deposite Scheme
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेणार आहेत.आजकाल सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी अनेकजण पोस्ट ऑफिसचा पर्याय निवडतात.पोस्ट ऑफिसच्या विविध स्कीमच्या माध्यमातून इतर गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला मोबदला मिळत असल्याने अनेक जणांचा इकडे कल आहे.

आज या लेखाच्या माध्यमातून आपण पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीम (TD AC) बद्दलची माहिती जाणून घेणार आहेत.या योजनेमध्ये तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेक्षा जास्त व्याज मिळणार आहे.या योजनेत तुम्ही 1 ते 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकणार आहेत.

7.5 टक्के इतके व्याज मिळणार
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आपण जर 5 वर्षांसाठी किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5 टक्के व्याज परतावा मिळणार आहे.आणि जर तुम्ही 3 वर्षांसाठी TD केल्यास तुम्हाला 6.90 टक्के दराने व्याज मिळणार आहे.Post Office Time Deposite Scheme

पैसे दुप्पट होण्यासाठी किती कलावधी लागतो?
तुम्हाला पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेच्या माध्यमातून तुमचे पैसे दुप्पट करायचे असल्यास तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक 7.5 टक्के इतक्या दराने व्याज मिळते.तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 114 महिने म्हणजेच सुमारे 9 वर्ष 6 महिने इतका कालावधी लागतो.

ठेव :- ७ लाख रुपये
व्याज दर :- ७.५
परिपक्वता कालावधी :- ५ वर्षे
परिपक्वतेवर मिळणारी रक्कम:- रू १०,१४,९६४/-
व्याज लाभ:- रू ३,१४,९६४/-

खाते कोण उघडू शकतो?
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजनेत सहभागी होण्याकरिता कोणतीही अविवाहित व्यक्ती आपले खाते उघडू शकते.तसेच कोणत्याही 3 प्रौढ व्यक्ती आपले संयुक्त खाते देखील उघडू शकतात.तसेच पालक आपल्या 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावावर देखील खाते उघडू शकतात.

हे पण वाचा:- आता गूगल पे वरून लोन मिळवा,तेही कोणत्याही कागदपत्रांशिवाय!

टाइम डिपॉझिट योजनेचा फायदा काय?
टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास परिपक्वतेवर मिळणाऱ्या रकमेवर आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा फायदा मिळतो.तसेच खातेदाराला खाते उघडताना नॉमिनेशन देखील करता येते. त्यामुळे भविष्यात कुठलीही अडचण येत नाही.Post Office Time Deposite Scheme

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment