Punjabrao Dakh Latest Havaman Andaj :- राज्यावर पुन्हा चक्रीवादळाचे सावट,या जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस,पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज!

Spread the love

Punjabrao Dakh Latest Havaman Andaj

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आपल्या राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक महत्वाचा संदेश शेतकऱ्यांसाठी दिला आहे.महाराष्ट्रात मुसळधार पाऊस तसेच गारपीट होण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे उरकून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परत एकदा पावसाचे आगमन

महाराष्ट्र राज्याला लागूनच असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होणार आहे.तसेच हे वादळ ओमान या देशाच्या दिशेने पुढे सरकणार असल्याचे सांगितले जात आहे.याचा फटका आपल्या महाराष्ट्राला देखील बसणार आहे.चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात मुसळधार आणि गारांचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज सांगितला आहे.तसेच राज्यातील काही भागांमध्ये दाट धुके देखील पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मिचौंग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचौंग चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.चेन्नई सारख्या शहरावर या चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.शहरांमधील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते या मध्ये अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या आहेत.तसेच काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.यामध्ये शेतकरी तसेच व्यापारी वर्गांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले आहे.अजून देखील दक्षिणेच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे पण वाचा:- या योजनेच्या अंतर्गत पाच हजार शेततळ्यांना मिळणार अनुदानाचा लाभ!

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये होणार तुफान पाऊस
Punjabrao Dakh Latest Havaman Andaj

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळ निर्माण झाले आहे.याचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार आहे.यामध्ये कोल्हापूर,सांगली,सातारा,पुणे जिल्ह्याचा काही भाग अहमदनगर,सोलापूर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी मधील जिल्हे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी सांगितला आहे.सदरचा हवामान अंदाज हा ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर या दरम्यान होणार असणाऱ्या मुसळधार पावसासाठी सांगण्यात आला आहे.

राज्यातील इतर भागांमध्ये दिवसा ढगाळ हवामान राहणार असून रात्री थंडीचा कडाका वाढत जाणार आहे.तसेच काही भागांमध्ये दाट धुके पाहायला मिळणार आहेत.असा अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस होणार आहे.शेतकऱ्यांनी आपली शेतातील कामे उरकून घ्यावीत.कांदा पीक काढणी शक्यतो टाळावी.आपल्या शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होणार नाही याची देखील काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.खरीप हंगामातील पिकांची काढणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment