Rabi Pik Vima 2023:- रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी मुदतवाढ,ही असेल शेवटची तारीख!

Spread the love

Rabi Pik Vima

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्य सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत १ रुपयात पिकांचा विमा उतरविण्यासाठी योजना राबविली होती.ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती परंतु खरीप हंगामातील पीक विमा अर्ज व्हेरीफाय न झाल्याने तसेच वेबसाईट न चालल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले.

किती दिवस मुदतवाढ देण्यात आली?
Rabi Pik Vima

हीच बाब राज्य सरकारच्या लक्षात आल्याने केंद्र सरकारला विनंती करून दोन दिवस मुदतवाढ करण्यात आली आहे.पिक विमा योजनेत आंबा, काजू व संत्रा हि फळपिके आणि रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्यास दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ देण्यात आली आहे.

हे पण वाचा:- केंद्र सरकारची नवीन योजना, ड्रोन खरेदीसाठी मिळणार 8 लाख रुपये अनुदान!

महाराष्ट्र राज्यात विमा योजना अंतर्गत २०२३-२४ मध्ये कोकणातील आंबा आणि सर्व राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता.

मात्र पीक विमा पोर्टल मध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.

पहा शासन निर्णय 👇🏻

Rabi Pik Vima

अंतिम मुदत किती असेल?
Rabi Pik Vima

सदर शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा या दृष्टिकोनातून कोकणातील आंबा पिक,सर्व राज्यातील काजू,संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची अतिरिक्त (वाढीव) मुदत वाढ मंजूर केली आहे.

कोकणातील आंबा,काजू,संत्रा तसेच रब्बी ज्वारी या पिकांचा विमा भरण्यासाठी दोन दिवसांची वाढीव मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पूर्वी या पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत ही ३० नोव्हेंबर २०२३ होती. परंतु आता वाढीव मुदत देण्यात आल्यामुळे या पिकांचा विमा ०४ व ०५ डिसेंबर २०२३ या दोन दिवसांत भरता येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment