पंजाबराव डख:- पावसाचे दसऱ्यानंतर पुन्हा आगमन होणार,या तारखेनंतर पडेल जोरदार पाऊस!

Spread the love

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पावसाची चिंता सतावू लागली आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ पाहायला मिळत आहे.याचाच परिणाम म्हणून ढगाळ वातावरण देखील निर्माण झाले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी देखील कोसळल्या आहेत.मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.काही ठिकाणी परतीचा पाऊस देखील पाहायला मिळाला आहे.नाशिक जिल्ह्यातील सटाणा आणि देवळा परिसरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला आहे.

वाढत्या तापमानामुळे राज्यातील नागरिक ऑक्टोबर हिटमुळे हैराण झाले आहेत.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वच नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 18 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता वर्तविली आहे.पाऊस हा राज्यातील विविध भागांमध्ये पडण्याची शक्यता आहे.या दिवशी राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे.

पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे आज राज्यातील सातारा,सांगली,कोल्हापूर सारख्या विविध भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:- तुकडेबंदी कायद्यामध्ये मोठी सुधारणा, आता इतक्या गुंठयाची खरेदी विक्री करता येणार

पंजाबराव यांनी गोव्यासाठी देखील हवामान अंदाज दिला आहे.त्या ठिकाणी देखील पणजी आणि विविध भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज सांगितला आहे.तसेच काही भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील.

मात्र पंजाबराव डख यांनी दसरा झाल्यानंतर राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन चांगला पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे.त्यामुळे राज्यात 24 ऑक्टोबर नंतर पावसाचे पुन्हा कमबॅक होणार आहे.

तसेच त्यांनी या वर्षी 28 ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे यंदा दिवाळीमध्ये देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे.पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज कितपत योग्य ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment