Rashtriya Bachat Yojana| पोस्टाची भन्नाट योजना,मिळेल बक्कळ व्याज व्हाल मालामाल! जाणून घ्या सविस्तर!

Spread the love

Rashtriya Bachat Yojana

Rashtriya Bachat Yojana
आजच्या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.सदर योजनेत आपल्याला मोठ्या प्रमाणात व्याजाचा मोबदला मिळणार आहे.तर ही योजना नेमकी काय आहे याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

या योजनेची पात्रता,निकष आणि कोण कोण सहभागी होऊ शकतो? याची माहिती आज आपण घेणार आहोत.तुम्ही देखील सुरक्षित योजनेत गुंतवणूक करण्याचा आणि मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवण्याचा विचार करत असाल तर ही योजना नक्कीच तुमच्या फायद्याची आहे.

Rashtriya Bachat Yojana

केंद्र सरकार नेहमीच देशातील नागरिकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय देत असते जसे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी,सुकन्या समृद्धी योजना,राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र,ज्येष्ठ नागरिक बचत योजना,किसान बचत पत्र यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.

या सर्व गुंतवणूक योजनेंची हमी सरकार घेत असते.आपला पैसा त्यामूळे बुडत नाही.केंद्र सरकार द्वारा चालवल्या जाणाऱ्या योजनांमधून गुंतवणूक दारांना एक विशिष्ट मासिक उत्पन्न मिळते.

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना

ही योजना देशातील प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये चालवली जाते.सदर योजना ही राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना या नावाने ओळखली जाते.सदर योजनेला POMIS असं नाव देण्यात आले आहे.

या योजनेत एक हजार रुपयांच्या पटित गुंतवणूक करता येते.वैयक्तिक एका व्यक्तीला जास्तीत जास्त ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करत येते आणि संयुक्त खातेदाराला जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

मासिक उत्पन्न योजना

सदर योजनेमध्ये खातेदाराला वैयक्तिक आणि संयुक्त अशा दोन्ही प्रकारे गुंतवणूक करता येते.या योजनेत पालक आपल्या पाल्यांच्या नावे,दिव्यांग,मानसिक दृष्ट्या कमजोर,
बालकांच्या नावे देखील गुंतवणूक करता येते.

हे पण वाचा:- या योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी मिळणार प्रत्येकी २५००/- रुपये !

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर एका वर्षापर्यंत खाते बंद करता येत नाही.जर खाते बंद करावयाचे झाल्यास गुंतवणूक केल्यापासून ३ वर्षाच्या आत बंद करता येते.योजनेचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर ती बंद केल्यास जमा रकमेवर २% दंड गुंतवणूक दाराला भरावा लागतो.

या योजनेत गुंतवणूक केल्यास खाते उघडल्यानंतर त्या खात्याच्या मॅच्युरीटी पर्यंत प्रत्येक महिन्याला व्याजाची रक्कम खात्यात जमा केली जाते.
या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला ७.४ टक्के इतका वार्षिक व्याजदर गुंतवणूक दाराला मिळतो.

सदर योजनेची तपशील पर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment