Ration Card News
देशात कोरोना काळापासून देशातील नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत रेशन धान्य देण्यात येत आहे.तसेच मागील काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ही योजना पुढील पाच वर्षे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे देशातील रेशन कार्ड धारक कुटुंबाला अजून पाच वर्षे मोफत धान्य मिळणार आहे.
देशातील अनेक रेशन कार्डधारक व्यक्तींच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो की सरकारकडून आपल्याला किती धान्य मिळते?आणि रेशन दुकानदार तेवढे आपल्याला देत आहे का?.हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही.तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून सरकारकडून तुम्हाला किती धान्य दिले जात आहे याची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मेरा रेशन हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.तसेच तुम्हाला किती रेशन मिळते हे कसे चेक करायचे याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत.त्यामुळे सदरचा लेख शेवट पर्यंत वाचा.
हे पण वाचा:- आता घरबसल्या मोबाईलवरून काढा रेशन कार्ड तेही अगदी मोफत,कसे काढायचे?जाणून घ्या सविस्तर!
तुम्हाला किती धान्य मिळते कसे चेक करायचे?
•तुमच्या मोबाईल मधील गूगल प्ले स्टोअरवर जाऊन मेरा रेशन (Mera Ration) हे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून इंस्टॉल करून घ्या.
•हे मोबाईल ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या द्या.
•आता तुमच्यासमोर तुमचे मोबाईल ॲप्लिकेशन ओपन होईल.तिथे उजव्या कोपऱ्यातील तीन रेषांवर क्लिक करून मराठी भाषा या पर्यायावर क्लिक करा.
•आता तुम्हाला लाभ माहिती या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे.
•यासाठी तुम्हाला तुमचा १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक माहित असणे आवश्यक आहे.नाहीतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक टाकून सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
•आता तुमच्यासमोर लाभ माहिती नावाचे नवीन पेज ओपन होईल.तिथे तुम्हाला चालू महिन्यात किती धान्य मिळणार आहे याची माहिती कळणार आहे.
•या ठिकाणी तुम्हाला तुमचा १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक देखील पाहायला मिळणार आहे.
•तसेच तुम्हाला कोणते धान्य मिळणार आहे याची देखील माहिती मिळते.वाटप या रकाण्याच्या खाली तुम्हाला किती किलोग्रॅम धान्य मिळणार आहे याची माहिती दिसते.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईल वरून घरबसल्या रेशन कार्डवर सरकार कडून किती धान्य मिळते याची माहिती घेऊ शकणार आहेत.तुम्हाला सरकार कडून मिळणारे धान्य आणि रेशन दुकानदार देणारे धान्य यामध्ये काही तफावत आढळून आल्यास तुम्ही तक्रार देखील करू शकणार आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.