Rules For Purchase Of Land:- एका व्यक्तीच्या नावावर किती शेतजमीन खरेदी करता येते?काय सांगतो नियम आणि कायदा,जाणून घ्या राज्यानुसार माहिती!

Spread the love

Rules For Purchase Of Land
भविष्यासाठी काहीतरी गुंतवणूक करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.त्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा भागवून थोडी का होईना पण बचत करीत असतात.यातूनच काहीजण मालमत्ता खरेदीसाठी गुंतवणूक करतात.कोणी सोने खरेदी करतो तर कोणी घर,जागा खरेदी करत असतात.शेतजमीन हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे.कालांतराने शेतजमिनीचे भाव वाढतच जातात.

परंतु भारतात शेतजमीन खरेदी करण्यासाठी काही नियम आणि कायदे आहेत.प्रत्येक राज्यानुसार हे नियम आणि कायदे वेगवेगळे आहेत.एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त शेत जमीन खरेदी करता येत नाही.काही राज्यांमध्ये वेळोवेळी या नियमांमध्ये बदल केले जातात.आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण शेतजमीन खरेदीसाठी असलेल्या नियम आणि अटी जाणून घेणार आहेत.

यांना शेतजमीन विकत घेता येत नाही.

अनिवासी भारतीय किंवा परदेशातील नागरिक आपल्या भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी शेतजमीन विकत घेऊ शकत नाहीत.भारत सरकारद्वारे अशा व्यक्तींना शेतजमीन खरेदी करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.तसेच या व्यक्ती भारतामध्ये फॉर्म हाऊस किंवा वृक्षारोपण मालमत्ता सुद्धा खरेदी करू शकत नाहीत.परंतु भारतातील एखाद्या व्यक्तीला अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिकाला वारसा हक्काने शेतजमीन द्यायची असेल तर ते देऊ शकणार आहेत.Rules for purchase of land

हे पण वाचा:- तुम्हाला शेतजमीन पाहिजे?इथे अर्ज करा,राज्य सरकारचे शेती महामंडळ देणार तुम्हाला शेतजमीन,विश्वास नाही ना बसत?मग नक्की जाणून घ्या!

भारतामध्ये कोणत्याही राज्यात शेतजमीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला त्या राज्यातील सरकारचे नियम आणि कायदे पाळणे आवश्यक आहे.त्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही कायदेशीर समस्या उद्भवणार नाहीत. त्यासाठी तुम्ही संबंधित राज्यातील भूमिअभिलेख विभाग किंवा स्थानिक प्रशासकीय प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून माहिती घेऊ शकता.

राज्यांनुसार कमाल जमीन खरेदी मर्यादा
Rules For Purchase Of Land

भारतामध्ये विविध राज्यांनुसार जमीन खरेदी मर्यादा ही वेगवेगळी आहे.

•उत्तर प्रदेश – एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त १२.५ हेक्टर शेतजमीन खरेदी करता येते.

•मध्य प्रदेश – एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त १० हेक्टर शेतजमीन खरेदी करता येते.

•पंजाब – शेतजमीन खरेदी करण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही.

•हरियाणा – या राज्यात देखील शेतजमीन खरेदी करण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही.

•राजस्थान – एक व्यक्ती जास्तीत जास्त १० हेक्टर शेतजमीन खरेदी करू शकतो.

•महाराष्ट्र – आपल्या राज्यात एका व्यक्तीला शेतजमीन खरेदी करण्याची कमाल मर्यादा ही ५४ एकर आहे.

वर नमूद केलेली शेतजमीन खरेदी मर्यादा ही विविध राज्यांच्या नियमांचा सारांश आहे.भारतामध्ये लागवडीयोग्य शेतजमीन खरेदी करण्याची कमाल मर्यादा ही साधारणपणे १० ते १२.५ हेक्टर एवढी आहे.तसेच नियमांच्या अधिक माहितीसाठी आपण आपल्या राज्याच्या भूविकास विभागाशी किंवा स्थानिक विकास प्राधिकरण विभागाशी संपर्क साधू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment