तुमच्या बँक खात्याला पॅन कार्ड लिंक नसल्यास खाते होईल बंद?पहा काय सांगितले ‘या’ बँकेने! SBI Bank

Spread the love

SBI Bank
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मेसेज व्हायरल केला जात आहे,ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की,तुमचे एसबीआय बँकेत खाते असेल आणि तुमच्या खात्याला पॅन कार्ड लिंक केलेले नसेल तर तुमचे बँक खाते बंद करण्यात येईल.जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर विश्वास ठेवण्यापूर्वी त्या मेसेजची सत्यता जाणून घ्या.या लेखाच्या माध्यमातून संबंधित मेसेजची सत्यता आपण जाणून घेणार आहेत.

सदर प्रकरणासंबंधी भारताच्या अधिकृत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे.पीआयबी च्या वतीने अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करून या प्रकरणाची माहिती सांगितली आहे.ज्यामधे सांगितले आहे की,गेल्या काही दिवसांपासून फसवणूक करणारे स्टेट बँकेच्या नावाने लोकांना मेसेज अशा प्रकारचे मेसेज पाठविले जात आहेत ज्यामध्ये ‘तूम्ही तुमच्या खात्याशी पॅन क्रमांक अपडेट केले नसल्यास तुमचे खाते ब्लॉक करण्यात येईल’ असे सांगितले आहे.

तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही ग्राहकांना कॉल करून देखील ही माहिती सांगितली जात आहे.त्यामध्ये तुमचे पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचा सल्ला दिला जात आहे.तरी पीआयबी ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी अशा मेसेज आणि फोन कॉल्स वर कसलाही विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे.नाहीतर तुमची फसवणूक देखील केली जाऊ शकते.हे मेसेज आणि फोन कॉल्स पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले आहे.

हे पण वाचा:- घरामध्ये किती रोख रक्कम ठेवता येते?काय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम?जाणून घ्या सविस्तर!

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने ग्राहकांना वेळोवेळी अशा फसवणुकीच्या मेसेज आणि कॉल्स पासून सावध राहण्याचे सांगितले जात आहे.बँक कोणालाही मेसेज किंवा कॉल्स करून पॅन कार्ड किंवा आधार कार्ड लिंक करण्यास तसेच ई केवायसी करण्यास सांगितले जात नाही.तसेच यासाठी कोणत्याही प्रकारच्या लिंक्स पाठवल्या जात नाहीत.

जर स्टेट बँक ऑफ इंडियाचा कोणताही ग्राहक अशा फसवणुकीला बळी पडल्यास त्यांना सायबर क्राईम सेलमध्ये 1930 या क्रमांकावर किंवा phishing@sbi.co.in या ई-मेल वर देखील तक्रार करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच आमच्या https://mhkhabar.com/ या वेबसाईटला भेट द्या.

Leave a comment