Scholarship For Students :- नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना,मिळणार 9 ते 14,600 रुपयांची स्कॉलरशिप,Apply Now

Spread the love

Scholarship For Students

Scholarship For Students
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाइट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार मार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती घेणार आहोत.

विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या हेतूने केंद्र सरकार मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे.या योजनेमध्ये दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत ही ३० नोव्हेंबर असणार आहे.त्या अगोदर विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्यासाठी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश हा सर्व सामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे,त्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत हा आहे.त्यांना आर्थिक हातभार लावल्याने त्यांना शैक्षणिक क्षेत्रात कुठली अडचण येणार नाही.

हे पण वाचा:- या योजनेच्या अंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रुपये

स्कॉलरशिप साठी असणारी आवश्यक पात्रता Scholarship For Students

१.ही योजना फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे.

२.स्कॉलरशिप एका इयत्तेला एकाच शैक्षणिक वर्षासाठी लागू असणार आहे.

३.या योजनेसाठी इयत्ता नववी आणि दहावीचे फक्त अनुदानित शाळेतीलच विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत.

४.यासाठी विद्यार्थ्यांकडे किमान ४०% टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाण असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

५.विद्यार्थ्यांना दिलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने वैध कायद्यानुसार दिलेले असावे.

६.दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 50 हजारांपेक्षा जास्त नसावे.

सदर योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.Scholarship For Students

१.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 30 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे.

२.विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेल्या अर्जांची शाळा स्तरावर पडताळणी केली जाणार आहे. शाळा स्तरावर अर्ज पडताळणी करण्याची मुदत ही 15 डिसेंबर पर्यंत असणार आहे.

३.शाळा स्तरावर पडताळणी केलेल्या अर्जांची जिल्हा स्तरावर पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे.त्याची मुदत ही ३० डिसेंबर असणार आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट पोर्टलला भेट द्यावी.

https://scholarships.gov.in/

https://disabilityaffairs.gov.in/content/

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment