SIP Investment
मित्रांनो,प्रत्येकाला आयुष्यात मोठे घर,गाडी,बंगला,पैसे, सोने नाणे व दाग दागिने अशा गोष्टी असाव्या वाटतात. आयुष्यात काही तरी मोठे करून दाखवण्याची प्रत्येकाची स्वप्ने असतात.ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते.मग ते पैसे चांगल्या गुंतवणुकीतून उभे केले जाऊ शकतात.परंतु गुंतवणूक देखील योग्य ठिकाणी करावी लागते म्हणजे त्यातून मिळणारा परतावा चांगला असेल.
तर मित्रांनो तुमची कोट्यधीश होण्याची स्वप्ने १०,००० रुपयांच्या दरमहा गुंतवणुकीच्या माध्यमातून पूर्ण होणे शक्य आहे का?तर उत्तर हो असेल.तुम्ही १० हजार रुपये दरमहा एसआयपी (SIP Investment) मध्ये गुंतवणूक करून एक कोटी रुपये कमावू शकणार आहेत.परंतु त्यासाठी तुमच्याकडे संयम,दीर्घकालीन नियोजन,योग्य गुंतवणूक योजना यांची गरज आहे.
SIP म्हणजे काय?
SIP (Systematic Investment Plan) म्हणजे काही म्युच्युअल फंड योजना नाही आहे.ही एक गुंतवणूक योजना आहे जिच्या माध्यमातून एक ठराविक रक्कम नियमित एका महिन्याला किंवा तीन महिन्याला म्युच्युअल फंड योजनेमध्ये गुंतविली जाते.
आपल्याला महिन्याला १० हजार रुपयांच्या SIP च्या माध्यमातून एक कोटी रुपये कसे कमावले जाऊ शकतात यासाठी काही गोष्टींचे पालन करावे लागेल.त्यासाठी आपल्याला काहीतरी नियोजन करावे लागेल.याचीच माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
१.गुंतवणुकीचा कालावधी
कोणत्याही SIP मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.तुम्हाला त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे असणार आहे.एक कोटी रुपये कमावण्यासाठी देखील तुम्हाला १५-२० वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे.यामुळे तुमच्या गुंतवणुकीला चांगला बहर येऊन तुम्हाला अधिक रिटर्न्स मिळणार आहेत.शेअर बाजारात चढ-उतार येतच राहतात,परंतु एक गोष्ट लक्षात घ्या दीर्घकालीन गुंतवणूकीला चांगलाच परतावा दिला आहे.
२.योग्य योजनेची निवड
चांगला परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य म्युच्युअल फंड योजनेमध्ये SIP गुंतवणूक करावी लागणार आहे. तुमच्याकडे असलेल्या जोखीम क्षमतेच्या अनुसार तुम्ही लार्ज कॅप,मिड कॅप,स्मॉल कॅप किंवा इक्विटी-डेब्ट मिक्स योजनांची निवड करायला हवी.तुम्ही या क्षेत्रातील एक्सपर्ट किंवा गुंतवणूकदार यांचा देखील सल्ला घेऊन त्यावर संशोधन करायला हवे.
३.गुंतवणुकीमध्ये खंड न पडू देणे
तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारचा खंड पडू नाही दिला पाहिजे.प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे.त्यामुळे तुमची गुंतवणूक शिस्तबद्ध होते आणि शेअर बाजारामध्ये झालेल्या चढ-उतारांचा परिणाम कमी होतो.तसेच रुपयाच्या किंमतीच्या घसरणीचा मुकाबला करण्यासाठी तुम्ही दरवर्षी SIP रक्कम वाढविणे देखील फायद्याचे ठरू शकते.
४.संयम ठेवणे
शेअर बाजारातील चढ उतार पाहून बाजार खाली आला की तुमची गुंतवणूक थांबवली नाही पाहिजे.शेअर बाजारातील चढ उतार हा एक रोजचाच भाग आहे.तुम्हाला फक्त शेअर बाजारात दीर्घकालीन टिकून राहायचे आहे.त्यासाठी तुम्ही संयम ठेवला पाहिजे.
५.योग्य पूनर्गुंतवणुक
आपल्याला SIP गुंतवणुकीमुळे म्युचुअल फंडामधून मिळणारे डिविडेंड पुन्हा गुंतविल्यास तुम्हाला कम्पाऊंड इंटरेस्ट (चक्रवाढ व्याज) चा चांगला फायदा मिळतो.यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम जलद गतीने वाढ होण्यास मदत होते.
उदाहरण पाहूया
तुम्ही जर प्रत्येक महिन्याला १० हजार रुपयांच्या SIP द्वारे १५ वर्षांसाठी १२ टक्के चक्रवाढ व्याजदराने गुंतवणूक केली तर,तुम्हाला SIP परिपक्व कालावधी नंतर सुमारे १ कोटी ७ लाख रुपये मिळू शकणार आहेत.
आपल्यासाठी टीप
वरती नमूद केलेले फक्त एक उदाहरण आहे.प्रत्यक्ष बाजारातील परतावा या पेक्षा जास्त किंवा कमी देखील असू शकतो.शेअर बाजारातील चढ उतारानुसार आपल्याला SIP चा परतावा मिळू शकतो.तसेच गुंतवणूक करताना आपली जोखीम घेण्याची क्षमता आणि योग्य गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.