सोयाबीन उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,पहा येत्या दोन महिन्यात सोयाबीनला किती भाव मिळणार! Soyabean Market Rate

Spread the love

Soyabean Market Rate
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यातील सोयाबीन उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.खरीप हंगामामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांची आर्थिक गरज या पिकांमधून येणाऱ्या पैशाने भागवली जाते.मागील काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला दिवाळीपूर्वी चांगला भाव मिळत असल्याचे दिसत आहे. परंतु यंदाच्या दिवाळीत सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांना पूर्णपणे नाराज केले आहे.

राज्यात या वर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाल्याने सोयाबीन पिकाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या.त्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.तरीदेखील या वर्षी सोयाबीन पिकाला मार्केटमध्ये(Soyabean Market Rate) योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीनसह मका,तूर,उडीद या पिकांच्या उत्पादनामध्ये देखील घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरासरीच्या कमी पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेत अडकला आहे.

खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन जरी घटले असेल तरी मार्केटमध्ये पिकांना हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे.सोयाबीन पिकाचा उतार गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाला असला तरी योग्य भाव मिळत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

अशातच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सोयाबीनच्या मार्केटमधून पाहायला मिळत आहे.दिवाळीचा कालावधी संपल्यानंतर सोयाबीनला किमान आधारभूत किंमतीपेक्षा (एमएसपी)जास्त भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही काळामध्ये सोयाबीनच्या भवामध्ये आणखी विक्रमी वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांनी वर्तविली आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी खुशखबर,खतांसाठी मिळणार सबसिडी,एवढ्या रुपयांनी खते होणार स्वस्त!

सध्या सोयाबीनला सरासरी पाच हजार रुपयांच्या घरात भाव मिळत आहे.तसेच भविष्यात सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे.त्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये तेजी पाहायला मिळणार आहे.जाणकार व्यक्तींनी सांगितल्या अंदाजानुसार सोयाबीनला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात चांगला भाव मिळणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment