जनावरांचा गोठा बांधण्यासाठी मिळणार 2 लाख 50 हजार रुपये अनुदान,असा करा अर्ज! Subsidy for Cowshed

Spread the love

Subsidy for Cowshed
राज्यातील शेतकरी वर्ग शेतीला जोडधंदा म्हणून पशू पालन व्यवसाय करत असतात.दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकरी गाय आणि म्हैस यांचे पालन करीत असतात.परंतु काही शेतकऱ्यांकडे जनावरांसाठी निवारा उपलब्ध नसतो. आता हाच निवारा उभा करण्यासाठी सरकारच्या वतीने अनुदान दिले जात आहे.

यासाठी सरकार २ लाख ५० हजार रुपये अनुदान देत आहे.सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून शेतकरी आपल्या जनावरांसाठी निवारा शेड उभारू शकणार आहेत.या योजनेच्या माध्यमातून कोंबड्यांसाठी देखील पोल्ट्री फॉर्म तयार करता येणार आहे.

केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सतत नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जात असतात.त्यापैकीच ही एक महत्वकांक्षी योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.Subsidy for Cowshed

हे पण वाचा:- तुम्हाला शेतजमीन पाहिजे?इथे अर्ज करा,राज्य सरकारचे शेती महामंडळ देणार तुम्हाला शेतजमीन, विश्वास नाही ना बसत?मग नक्की जाणून घ्या!

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने रोजगार हमी योजनेतून या योजनेच्या माध्यमातून २ लाख ५० हजार रुपये अनुदान वितरित करण्यात येणार आहे.या योजनेतून गाई,म्हशी, शेळी,कोंबड्या यांना निवारा अर्थातच शेड उभारण्यात येणार आहे.शेतकरी वर्गाला पशूधनासाठी उत्तम प्रकारचे निवारा शेड देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे.

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे.महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला हिरवा कंदील दिला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले अर्ज करायची तयारी करायची आहे.Subsidy for Cowshed

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा

Leave a comment