Sukanya Samriddhi Yojana21 व्या वर्षी मिळतील तब्बल 67 लाख रुपये,सरकारच्या या योजनेत मुलीच्या भविष्यासाठी करा तरतूद! Apply Now Free

Spread the love

Sukanya Samriddhi Yojana

नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.केंद्र सरकारच्या माध्यमातून महिला तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात.आजकालच्या महागाईच्या काळात मुलींचे शिक्षण,लग्न यांकरिता मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.यामुळे अनेक पालक चिंताग्रस्त आहेत.परंतु मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास कुठलीही चिंता करण्याची गरज पडत नाही.मुलींच्या भविष्यासाठी देखील शासन विविध प्रकारच्या योजना राबवित असते.जेणेकरून मुलींना भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविले जावे.

काय आहे योजना?
Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana

केंद्र सरकारच्या माध्यमातून मुलींच्या भविष्यासाठी एक कल्याणकारी आणि फायद्याची योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या अंतर्गत गुंतवणूक केल्यास भविष्यामध्ये मुलींना याचा चांगला परतावा मिळणार आहे. आम्ही बोलत आहोत केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेबद्दल.ही योजना मुलींच्या भविष्यासाठी सुरू करण्यात आली आहे.या योजनेसाठी सध्या वार्षिक ८ टक्के इतका व्याजाचा मोबदला दिला जात आहे.

योजनेचे फायदे Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana

१.योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये रक्कम प्रती वर्षी गुंतवणूक करता येते.परिपक्वता कालावधी २१ वर्षांचा आहे.
२.या योजनेत गुंतवणूक केल्यास सध्या ८ टक्के इतका व्याज दर मिळणार आहे.
३.या योजनेत जमा केले जाणारे पैसे,मिळणारे व्याज आणि परिपक्वता झाल्यानंतर मिळणारी रक्कम कलम ८०सी नुसार करमुक्त असणार आहे.
४.योजनेच्या अंतर्गत पोस्टात किंवा बँकेत खाते उघडल्यास भविष्यात कुठेही सदरचे खाते ट्रान्सफर करता येणार आहे.
५.परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यानंतर खाते बंद न केल्यास देखील व्याज मिळत राहणार आहे.
६.मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न न झाल्यास देखील ५० टक्के रक्कम काढता येणार आहे.

हे पण वाचा:- पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवा आणि 114 महिन्यात दुप्पट रक्कम मिळवा!

योजनेसाठी आवश्यक पात्रता Sukanya Samriddhi Yojana

१.सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याच्या तारखेला दहा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलीच्या नावावर पालकांपैकी कोणाच्याही एकाच्या नावावर खाते उघडले जाऊ शकते.
२.या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक खातेदाराला फक्त एकच खाते उघडता येणार आहे.
३.या योजनेच्या अंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी खाते उघडले जाऊ शकते.
४.जर एकाच कुटुंबात दोन जुळ्या मुली असतील तर दोन पेक्षा अधिक मुलींचे खाते उघडता येणार आहे.

Sukanya Samriddhi Yojana

अर्ज कुठे करायचा?Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे.यासाठी आपल्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा सुकन्या समृद्धी योजनेत सहभागी झालेल्या बँकामध्ये खाते उघडता येणार आहे.त्यासाठी खालील गोष्टी करा.
१.आपल्याला खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागणार आहे.
२.तिथे गेल्यानंतर आवश्यक माहितीसह अर्ज सुकन्या समृद्धी योजनेसाठी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
३.पहिल्यांदा रक्कम जमा करताना रोख,चेक किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे जमा करावी.कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये या दरम्यान रक्कम असावी.
४.आपल्या अर्जाची बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल.
५.सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपले सुकन्या समृद्धी योजनेचे(Sukanya Samriddhi Yojana) खाते सुरू केले जाईल.तसेच आपल्याला या खात्याचे पासबुक दिले जाईल.

आवश्यक कागदपत्रे Sukanya Samriddhi Scheme

१.मुलीच्या जन्माचा दाखला
२.मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक असलेल्या व्यक्तीचे ओळख प्रमाणपत्र
३.मुलीचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक असलेल्या व्यक्तीचा पत्त्याचा पुरावा
४.इतर केवायसी कागदपत्रे जसे की पॅन कार्ड,मतदार ओळखपत्र
५.सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठीचा आवश्यक अर्ज
६.जर एकाच क्रमामध्ये एकापेक्षा जास्त अपत्य जन्माला आली असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र
७.तसेच बँक किंवा पोस्ट ऑफिसने मागणी केलेले इतर कागदपत्रे

सदर योजनेत एखाद्या गुंतवणूक दाराने वार्षिक १.५० लाख रूपये गुंतवणूक केली असेल.जेव्हा त्याची मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर संपूर्ण रक्कम काढली तर त्या गुंतवणूकदार व्यक्तीला ४४,८४,५३४/- रुपये इतका व्याजाचा परतावा मिळेल.संपूर्ण एकवीस वर्षांत भरलेली एकूण रक्कम २२,५०,०००/- रुपये असेल.तसेच त्या गुंतवणूक दाराला एकूण ६७,३४,५३४/- रुपये इतकी परिपक्वता रक्कम मिळणार आहे.विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण रक्कम करमुक्त असणार आहे.

Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजनेत ठराविक गुंतवणूक केल्यास किती फायदा मिळेल हे चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment