बातमी आनंदाची,देशातील 11 कोटी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार घेणार हा मोठा निर्णय,कसा मिळणार शेतकऱ्यांना लाभ?

Spread the love

Farmer Scheme: जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून केंद्र सरकारचे विशेष अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.यंदा लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी होणाऱ्या या अर्थसंकल्पावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडतील.

या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या जातात किंवा काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.विशेष बाब म्हणजे हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकांपूर्वी मांडला जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद केली जाईल असा विश्वास शेतकऱ्यांना वाटतो.

अलीकडेच मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याचे समजते.

देशातील जवळपास ११ कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा फायदा होत आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचे वितरण करण्यात येते.शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून १५ हप्त्यांचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेच्या रकमेत दोन हजार रुपयांची वाढ केली जाणार असल्याचे मीडिया रिपोर्ट नुसार समजते.त्यामुळे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयां ऐवजी आठ हजार रुपये मिळू शकणार आहेत.याचा निश्चितच शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे.

केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना लवकरच १६ व्या हप्त्याची रक्कम मार्च महिनाच्या अगोदर मिळू शकणार आहे.मागील नोव्हेंबर महिन्यात १५ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे.तसेच या योजनेपासून वंचित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करण्यासाठी विशेष अभियान देखील संपूर्ण देशात राबविले जात आहे.

हे पण वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय,या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ३६ हजार रुपयांची मदत,तुम्हाला पण मिळणार का?

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट द्या.

Leave a comment