Water Light :- आता मिठाच्या पाण्यावर चालणार लाईट तेही 45 दिवस,कसे ते जाणून घ्या!

Spread the love

Water Light

Water Light
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण एका खूप मनोरंजक आणि अगदी खऱ्या खुऱ्या एका अत्यंत महत्वाच्या विषयाची माहिती घेणार आहोत.आपल्या पृथ्वीवर असे कोट्यवधी लोक आहेत की ज्यांच्या पर्यंत अजून वीज पोहोचलेली नाही.

आजकालच्या काळात वीज ही सर्वांसाठी खूप महत्त्वाची गरज बनली आहे.तंत्रज्ञानाच्या युगात विजेवरच सर्व काही अवलंबून आहे.आता पर्यंत ज्या लोकांनी वीज पहिली नाही त्यांच्यासाठी एक खूप महत्वाची बातमी समोर आली आहे.

एका कोलंबियन पॉवर स्टार्ट अप E-Dina या कंपनीने मिठाच्या पाण्यावर चालणाऱ्या वॉटर लाईटची निर्मिती केली आहे.होय हे ऐकायला खोटे वाटेल परंतु त्यांनी हा चमत्कार करून दाखवला आहे.त्यामुळे संपूर्ण जगातील ऑफ ग्रिड समुदाय तसेच जिथे सूर्य जास्त वेळ राहत नाही अशा ठिकाणी ही एक नवसंजीवनीच ठरणार आहे.

काय आहे वॉटरलाईट?
What is Water Light

ही वॉटरलाईट मिठाच्या पाण्यावर चालते ज्याला कुठल्याही बॅटरीची गरज नाही.फक्त अर्धा लिटर मिठाच्या पाण्यावर ही वॉटरलाईट तब्बल 45 दिवस चालते.यासाठी कुठल्याही सूर्यप्रकाशाची गरज भासत नाही.रात्री,दिवसा तसेच पावसात देखील कायमस्वरुपी चालूच राहते.याने तुम्ही तुमचा मोबाईल फोन देखील चार्ज करू शकणार आहेत.

हे पण वाचा:- राज्यात 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ,शेतकऱ्यांना मिळणारी हेक्टरी 17 हजार रुपये

वॉटरलाईट कसे काम करते?

वॉटरलाईट हा एक पोर्टेबल आणि कॉर्डलेस लाईट आहे जो वीज निर्माण करण्यासाठी खाऱ्या पाण्याचा वापर करतो. वॉटरलाईट हे खाऱ्या पाण्यापासून बनलेल्या इलेक्ट्रोलाइटचे आयनिकरण करून कार्य करते,जे आतील बाजूच्या मॅग्नेशियमचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित करते.या प्रक्रियेला रिव्हर्स इलेक्ट्रॉन फ्लो असे म्हणतात.यामुळे वॉटरलाईट कमी उन्हात किंवा वादळी परिस्थितीतही चोवीस तास शक्ती निर्माण करते.

वॉटरलाईटचे आयुष्यमान किती आहे?
Water Light Life Span

वॉटरलाईट ही 100% पुनर्वापर करता येण्याजोग्या सामग्री पासून बनविलेले तंत्रज्ञान आहे.ज्याचे अपेक्षित आयुष्य सुमारे 5600 तास आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment