सर्वसामान्यांसाठी चिंताजनक बातमी,1 जानेवारी पासून रेशन वाटप होणार बंद,काय आहे कारण?

Spread the love

Ration Shop Strike
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील रेशन वाटप १ जानेवारी पासून बंद ठेवण्यात आली आहे.राज्यातील रेशन दुकानदार त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर जात आहेत.त्यामुळे रेशन दुकानांमधून रेशन वाटप बंद ठेवण्यात येणार आहे.

रेशन दुकानदारांनी पुकारलेल्या संपामुळे संपाच्या काळात रेशन कार्ड धारकांना रेशन मिळणार नाही.राज्यातील सर्व रेशन दुकानदार १ जानेवारी २०२४ पासून संपावर जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.त्यामुळे नागरिकांना नवीन वर्ष सुरू होताच शुक्लकाष्ट लागणार की काय अशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली आहे.

मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार ऑल इंडिया फेअर्स प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन १ जानेवारी २०२४ पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.या संपामध्ये राज्यातील रेशन दुकानदार आणि किरकोळ केरोसीन परवानाधारक देखील सामील होणार आहेत.त्यामुळे संपाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना रेशन मिळणे मुश्कील होणार आहे.

हे पण वाचा:- तुम्हाला रेशन कार्डवर सरकारकडून किती धान्य मोफत मिळते?आणि दुकानदार किती देतो?याची संपूर्ण माहिती जाणून घ्या एका क्लिकवर, तुमच्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटांत!

हाती आलेल्या माहितीनुसार राज्यात ५३ हजार रेशन दुकानदार आहेत.हे सर्व दुकानदार संपावर गेल्यावर यामध्ये सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल होणार आहेत.रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी हा संप पुकारला असल्याचे बोलले जात आहे.मागील काही दिवसांपूर्वी रेशन दुकानदार संघटनांची शासानासोबत बैठक झाली होती.परंतु फक्त आश्वासने देऊन कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने पुन्हा संप पुकारला आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून राबविली जाणारी आनंदाचा शिधा ही योजना कायमस्वरुपी तत्वावर राबविली पाहिजे अशी मुख्य मागणी केली आहे.तसेच या योजनमध्ये कांदा,चणाडाळ,तूर डाळ, मूग डाळ या वस्तूंचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली आहे.रेशन दुकानदारांची मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करणे आणि मार्जिन मनी दोनशे रुपये करणे तसेच 2G मशीन ऐवजी 4G मशीन देण्यात याव्यात या प्रमुख मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment