Yojana:- गुड न्यूज,राज्यातील 8 लाख 14 हजार महिलांच्या खात्यात 5 हजार रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते जमा,तुम्हाला मिळाले का?

Spread the love

Yojana

Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महिला व बाल विकास विभागामार्फत महिलांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे तसेच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी या देखील उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील 8 लाख 14 हजार महिलांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करण्यात आले.महिलांना हा लाभ पीएम मातृवंदना योजनेच्या अंतर्गत देण्यात आला आहे.

काय आहे पीएम मातृवंदना योजना?

सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमीतून येणाऱ्या गर्भवती महिलांसाठी पीएम मातृवंदना योजनेच्या माध्यमातून 5000 रुपयांचा लाभ देण्यात येतो.आता या योजनेचा फायदा दुसरे अपत्य मुलगी झाल्यास देखील मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,महिला ही मातृशक्ती आहे.महिला या नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतात त्यामुळे त्या आदिशक्तीही आहेत.राज्य सरकार महिला सक्षमीकरण करण्यासाठी नेहमीच विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे.तसेच भविष्यात महिलांच्या बाबतीत उद्भवणारे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगितले.

हे पण वाचा:- आता मिळवा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तेही ऑनलाईन

राज्यात महिलांसाठी “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबविला जाणार आहे.या माध्यमातून राज्यातील 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना 1 एप्रिल 2023 पासून राबविली जाणार आहे.गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment