ZP Scheme 2023 :- महिलांना मिळणार ९०% अनुदानावर पिठाची गिरणी आणि इतर चार उद्योग मशीन्स,पहा आवश्यक कागदपत्रे!

Spread the love

ZP Scheme 2023

ZP Scheme 2023

महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण महिलांना अर्थसाक्षर आणि स्वावलंबी बनविण्याकरिता विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात.ज्याच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक हातभार दिला जातो.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभागातर्फे 2023-24 यावर्षा करिता ग्रामीण भागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला आणि मुलींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत.

सदर योजना ही जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत (ZP Scheme 2023)लाभार्थी महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, दाल मील,मसाला उद्योग मशीन सारख्या उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे.योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांनी आपले अर्ज 29 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

सदर योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना नक्कीच आर्थिक हातभार लागणार आहे.त्यामुळे त्यांचा सामाजिक त्याचबरोबर आर्थिक स्तर नक्कीच उंचावेल.या योजनेत सहभागी होण्यासाठी एका महिलेला एकच अर्ज करता येणार आहे.एकापेक्षा जास्त अर्जाचा कोणताही विचार केला जाणार नाही.

हे पण वाचा:- या योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी मिळणार प्रत्येकी २५००/- रुपये !

90% अनुदान कोणासाठी?

या जिल्हा परिषद योजनेअंतर्गत अनुसूचित प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी, दाल मील,शिलाई मशीन घेण्याकरिता जिल्हा परिषदेमार्फत 90% अनुदान देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

1)अर्जदार महिला ही किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(१२वी पास गुणपत्रक)
2)अर्जदार महिलेचे आधार कार्ड
3) ८अ (घराचा उतारा)
4)विहित नमुन्यातील अर्ज
5)तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला(कमाल उत्पन्न मर्यादा १ लाख २०हजार)
6)बँक पासबुक
7)लाईट बिल

वरील आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील भरलेल्या अर्जासोबत जोडून जिल्हा परिषद मध्ये २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी:- येथे क्लिक करा

संबंधित योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच अर्ज मिळवण्याकरिता तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

इच्छुक तसेच पात्र महिलांनी आपले अर्ज करण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यंडोले यांनी केले आहे.
सदर योजना ही बुलढाणा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment