Sanjay Gandhi Niradhar Yojana
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्य सरकार असो वा केंद्र सरकार महिला सशक्तीकरण करण्यासाठी महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असते.महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील महिला भगिनींसाठी एक योजना तयार करण्यात आली आहे.
Table of Contents
पुरुषांप्रमाणे महिलांना देखील विविध क्षेत्रामध्ये प्रगती साधता यावी यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.महिला आणि पुरुष लिंग गुणोत्तर समान राखता यावे,स्त्रीभ्रूण हत्या रोखता यावी,मुलींचा जन्मदर वाढवता यावा यासाठी सरकार विशेष प्रयत्न करीत आहे.मागील काही दिवसांपूर्वी महिलांसाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
काय आहे योजना?
Sanjay Gandhi Niradhar Yojana
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यातील महिलांसाठी एक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली आहे.संजय गांधी निराधार योजना असे या योजनेचे नाव आहे.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील निराधार असलेल्या महिलांना १५०० रुपये एवढे अनुदान प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.ही रक्कम निराधार महिलांना पेन्शनच्या स्वरूपात प्रत्येक महिन्याला पुरविली जाते.
कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळतो?
Sanjay Gandhi Niradhar Yojana
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून राज्यातील निराधार असलेल्या विधवा महिला,दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिला,वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला,अनाथ महिला,अत्याचारित महिला,देवदासी असणाऱ्या महिला आणि तुरुंगवास भोगत असलेल्या कुटुंब प्रमुख महिलांना लाभ दिला जातो.तसेच ३५ वर्षे वयांवरील अविवाहित निराधार महिला आणि दुर्बल घटकातील निराधार महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
•महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
•योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय किमान १८ ते कमाल ६५ वर्षे दरम्यान असावे.
•महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे रहिवाशी असलेल्या महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,कांद्याला मिळणार ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान!
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Sanjay Gandhi Niradhar Yojana
•आधार कार्ड
•रेशन कार्ड
•रहिवाशी दाखला (तहसीलदार यांचा)
•बँक पासबुक झेरॉक्स
•वय अधिवास प्रमाणपत्र
•तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला
•विधवा महिलांसाठी पतीचा मृत्यूचा दाखला
•अनाथ महिलांसाठी अनाथ असल्याचा दाखला
•दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना दुर्धर आजार प्रमाणपत्र
•दिव्यांग महिलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र
•पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्ज कुठे करायचा?
संजय गांधी निराधार योजना मध्ये सहभागी होण्यासाठी पात्र महिलांना तहसील कार्यालयात संपर्क करावा लागेल.किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जवळील ग्राहक सेवा केंद्रात जाऊन देखील अर्ज करता येणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.