Agriculture Electricity
Agriculture Electricity
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण शेती पंपाच्या लाईट विषयी असलेल्या एका अपडेट बद्दल जाणून घेणार आहोत.शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देण्याकरिता विजेची आवश्यकता असते.परंतु महाराष्ट्रातील अपुऱ्या वीज निर्मितीमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य होत नाही.शेतकरी वर्गाकडून दिवसा वीज मिळावी ही मागणी लावून धरली जात आहे.
Table of Contents
आता त्यावरच उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना 2.0 राबविण्याचा निर्णय घेतला आहे.पुणे जिल्ह्यात महावितरणकडून 221 मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.सदरची योजना राबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. Agriculture Electricity
हे पण वाचा:- पीएम कुसुम सोलर पंप योजनेच्या अनुदान रकमेत इतक्या रुपयांची वाढ
योजना राबविण्याकरिता गायरान जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी जवळपास 1 हजार 91 एकर जमिनीची आवश्यकता असणार आहे.सरकार या जमिनी वार्षिक 1 रुपया भाडे तत्वावर 30 वर्षांकरिता करार करणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य होणार आहे.त्याकरिता गायरान जमिनी हस्तांतरित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला मोलाची मदत केली आहे.तसेच जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी देखील मदत केली आहे.
बारामती मंडलातील 23 उपकेंद्रामध्ये सदर प्रकल्पासाठी एकूण 586 एकर गायरान जमीन महावितरणला मिळाली आहे.बारामती मंडलामध्ये बाभुळगाव आणि लोणी देवकर अशा दोन उपकेंद्राच्या ठिकाणी सदरचा प्रकल्प राबविला जाणार आहे. Agriculture Electricity
दोन्ही उपकेंद्राच्या ठिकाणी जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.लोणी देवकर उपकेंद्रासाठी 100 एकर आणि बाभुळगाव उपकेंद्रासाठी 45 एकर जमीन उपलब्ध झाली आहे.
तसेच लोणी देवकर उपकेंद्रात 20.16 मेगावॅट आणि बाभुळगाव उपकेंद्रात 9.38 मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.उर्वरित 21 उपकेंद्रात 221 मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे.
हे देखील वाचा :- शेतकऱ्यांची जमीन सरकार घेणार भाड्याने देणार 50 हजार रुपये प्रती एकर
शेतकऱ्यांना होणारे फायदे
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल.
शेतकऱ्यांना रात्री जागून शेताला पाणी देण्याची गरज नाही.
रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांपासून होणारे हल्ले कमी होतील.
शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल.
शेतकऱ्यांचा आर्थिक विकास कमी होईल.
प्रकल्पाची अंमलबजावणी कधी होईल?
प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यात केली जाणार आहे.पहिला टप्पा 2023-24 मध्ये पूर्ण होईल.
दुसरा टप्पा 2024-25 मध्ये पूर्ण होईल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.