Ek Shetkari Ek DP Yojana|एक शेतकरी एक डीपी योजना ऑनलाईन अर्ज सुरू,असा करा ऑनलाईन अर्ज 100% लाभ मिळणार! Apply Free

Spread the love

Ek Shetkari Ek DP Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आजच्या लेखामधून आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या एक शेतकरी एक डिपी योजनेची माहिती जाणून घेणार आहेत.शेतकऱ्यांना वारंवार विजेचा खंडित होणाऱ्या प्रवाहाची समस्या भेडसावत असते.शेती पिकाला पाणी देण्यासाठी विजेची गरज आवश्यक आहे.

काय आहे योजना?
Ek Shetkari Ek DP Yojana

राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर (डीपी) उपलब्ध करून दिला जातो.यासाठी मात्र शेतकऱ्यांना आपला स्वहिस्सा भरावा लागतो.

किती पैसे भरावे लागतात?
Ek Shetkari Ek DP Yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वहिस्स्याची रक्कम ही प्रवर्गानुसार वेगवेगळी भरावी लागते.सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रती एचपी ७ हजार रुपये रक्कम भरावी लागते.तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रती एचपी ५ हजार रुपये रक्कम भरावी लागते.ही रक्कम ज्या शेतकऱ्यांची जमीन २ हेक्टर पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी लागू आहे.तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन २ हेक्टर पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांसाठी प्रती एचपी ११ हजार रुपये रक्कम भरावी लागणार आहे.

हे पण वाचा:- ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करा 21000 रुपये भरून,एका चार्जवर धावणार 171 किलोमीटर!

आवश्यक कागदपत्रे

•आधार कार्ड
•पॅन कार्ड
•वीज बिल
•जमिनीचा ७/१२ उतारा
•जमिनीचा ८अ उतारा
•बँक पासबुक झेरॉक्स
•जातीचा दाखला

योजनेची उद्दिष्ट्ये
Ek Shetkari Ek DP Yojana

लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे,विद्युत पुरवठ्या मध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे,तांत्रिक वीज हानी होणे,डीपी मध्ये वारंवार बिघाड होणे,विद्युत अपघात होणे, लघु दाब वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी होणे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा या करिता सरकारच्या माध्यमातून एक शेतकरी एक डीपी योजना सुरू करण्यात आली आहे.

अर्ज कुठे करायचा?
Ek Shetkari Ek DP Yojana Online Application

आता शेतकऱ्यांना एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.या साठी महावितरणच्या mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन अर्ज करावा लागेल.त्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज कसा करायचा?

•ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यासाठी येथे क्लिक करा.
•आपल्यासमोर ए-1 अर्ज ओपन होईल तिथे कृषी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•आता नवीन अर्जाची नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•आपल्याला आवश्यक असलेल्या डीपीची क्षमता टाकायची आहे.
•आपल्याला आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
•तसेच पुढे फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
•सर्वात शेवटी तुमच्या मोबाईल वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
•अशा प्रकारे तुम्ही एक शेतकरी एक डीपी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment