शेतकऱ्यांनो ‘या’ जातीच्या गव्हाची लागवड करा,मिळतोय 8 हजार रुपये प्रति क्विंटल भाव | Black Wheat Cultivation in India

Spread the love

Black Wheat Cultivation in India

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्यात नुकताच खरीप हंगाम संपून रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे. राज्यात थंडीची चाहूल सुरू झाली आहे.कुठे कुठे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस देखील पडत आहे.

राज्यातील कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील हवामान येत्या काही दिवस पावसाचेच राहण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामतील पिकांची पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

राज्यात या वर्षी खरीप हंगामातील पिके पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातून निसटून गेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीच्या सामना करावा लागला आहे.आता रब्बी हंगामातील पिकांच्या देखील पेरण्या खोळंबल्या आहेत.राज्यातील ठराविक जिल्ह्यांमध्येच रब्बी ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे.

गव्हाच्या पेरणीसाठी काही भागांमध्ये सुरुवात

राज्यात विदर्भ तसेच इतर काही भागांमध्ये तापमानाचा पारा खाली चालला आहे.गुलाबी थंडीची चाहूल राज्यातील लोकांना लागली आहे.शेतकऱ्यांची देखील रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकाच्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे.परंतु राज्यात या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे रब्बी हंगामात कमी पावसामुळे पीक पेरा घटणार आहे.

गव्हाच्या या वाणामुळे शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा
Black Wheat Cultivation in India

महाराष्ट्रासारख्या राज्यात गहू या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.विशेषतः शेतकरी अजित 109,श्रीराम सुपर 303, सिंजेंटा कंपनीचे Neenv 1544,श्रीराम सुपर 111, लोकवन,अंकुर केदार,महिको मुकुट या गव्हाच्या वाणाची पेरणी करत असतात.

काळ्या गव्हाच्या वाणाला बाजारात मोठी मागणी

परंतु देशातील अनेक राज्यांमध्ये जसे की मध्य प्रदेश, पंजाब,राजस्थान,हरयाणा मध्ये काळ्या गव्हाच्या वाणांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.या गव्हाच्या वाणामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे नागरिकांमध्ये या गव्हाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.तसेच भाव देखील चांगला मिळत आहे.अलीकडेच मीडिया रिपोर्ट नुसार या जातीच्या काळ्या गव्हाला बाजार पेठेमध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी या गव्हाच्या वाणाची लागवड केल्यास फायदेशीर ठरू शकते.

काळ्या गव्हाच्या वाणाची विशेषता

हे गव्हाचे वाण ग्लूटेन मुक्त आहे त्यामुळे ज्या लोकांना ग्लूटेन ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी देखील हे योग्य आहे. काळ्या गव्हात अँथोसायनिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ज्यामुळे जळजळ कमी होणे,ऑक्सिडेटिव तणावापासून संरक्षण करणे आणि जुनाट आजारांचा धोका कमी करणे समाविष्ट आहे.

हे पण वाचा:- राज्यातील ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १७०० कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा!

काळ्या गव्हाची पेरणी कधी करावी?
Black Wheat Cultivation in India

काळ्या गव्हाची पेरणी रब्बी हंगामात केली जाते.त्यासाठी लवकर पेरणी करण्यासाठी नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवड्यात केली जाते.आणि वेळेनुसार पेरणी ही 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान केली जाते.तसेच उशिरा पेरणी करावयाची झाल्यास ती 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान करावी.पेरणीसाठी एकरी 40 ते 50 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी पिकाला पाच ते सहा पाणी देण्याची गरज असते.त्यासाठी गव्हाच्या विविध वाढीच्या अवस्थेत पाणी देणे गरजेचे आहे.गहू या पिकामध्ये पुढील वाढीच्या अवस्था आहेत.पिकाला नवीन मुळे फुटण्याच्या वेळी,पिकाचे फुटवे फुटताना, पिकाला ओंब्या लागताना,पिकाचे दाणे दुग्ध अवस्थेत असताना आणि पिकाचे दाणे परिपक्व होताना गहू या पिकाला पाण्याची गरज असते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment