Maratha Kunbi Certificate
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे.अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.
राज्यातील अनेक भागात मराठा आरक्षणासाठी विविध मोर्चे निघत आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.कुणबी मराठा प्रमाणपत्र वाटपासाठी पहिल्या टप्पाची उद्यापासून सुरुवात केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील मराठा बांधवांची कुणबी असल्याची नोंद शोधण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती.आता पर्यंत या शिंदे समितीने 11 हजार 530 बांधवांची कुणबी असल्याची नोंद तपासली आहे.या बांधवांना तहसीलदार यांच्याकडून कुणबी प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहेत.
मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली
कुणबी मराठा नोंदीसाठी नेमलेल्या शिंदे समितीने आजतागायत 1 कोटी 72 लाख नोंदी तपासल्या असून त्यात 11 हजार 530 नोंदी आढळल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तहसीलदार यांची बैठक बोलावून जुन्या नोंदी (Maratha Kunbi Certificate) असलेल्या व्यक्तींना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सूचना केल्या आहेत.या बैठकीला शिंदे उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजात काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.