PMJJBY Premium
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या विमा योजनेची माहिती जाणून घेणार आहेत.भारत सरकारच्या अर्थमंत्र्यांनी २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गरीब आणि विशेषाधिकारी गट लक्ष्य करून सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली.
Table of Contents
संपूर्ण देशभरात ही योजना विमा कंपन्या/PFRDA यांच्या सहकार्याने बँकांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.या योजनेला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे नाव देण्यात आले आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन करून भारतातील Star Union Dai-ichi Life Insurance Co Ltd (SUD Life) सह सामंजस्य करार केला आहे.
योजनेची पार्श्वभूमी PMJJBY Premium
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना संपूर्ण देशभर बँकांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांचे वय किमान १८ आणि कमाल ५० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.या योजनेमध्ये एकदा सहभाग नोंदविल्या नंतर दरवर्षी Renewal करावे लागते.ही विमा पॉलिसी १ जून ते ३१ मे च्या दरम्यान कधीही काढली जाऊ शकते.
योजनेत सहभागी होण्यासाठी भरावी लागणारी प्रीमियम रक्कम PMJJBY Premium
या योजनेमध्ये १ जून ते ३१ मे च्या दरम्यान कधीही सहभागी होता येते.यासाठी प्रीमियम भरायची रक्कम देखील प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळी देण्यात आली आहे. जून,जुलै व ऑगस्ट महिन्यात सहभागी झाल्यास ४३६ रुपये प्रीमियम रक्कम भरावी लागते.सप्टेंबर,ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सहभागी झाल्यास ३४२ रुपये प्रीमियम भरावा लागतो.डिसेंबर,जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सहभागी झाल्यास २२८ रुपये तसेच मार्च,एप्रिल किंवा मे महिन्यात सहभागी झाल्यास ११४ रुपये प्रीमियम रक्कम भरावी लागते.
योजनेचा फायदा Pradhan Matri Jeevan Jyoti Bima Yojana
या योजनेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणास्तव वयाच्या ५० वर्षांच्या आत मृत्यू झाल्यास विमा पॉलिसी साठी वारस असलेल्या व्यक्तीला २ लाख रुपये लाभ दिला जातो.विमा पॉलिसी धारक व्यक्तीचा मृत्यू झालेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत दावा करणे आवश्यक आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचे बचत बँक खाते असलेल्या बँकेत जाऊन तुम्ही सहभाग नोंदवू शकणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.