Rashtriya Kutumb Labh Yojana 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आज आपण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील गरीब नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या विषयी माहिती जाणून घेणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबांना 20 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
Table of Contents
काय आहे योजना?
Rashtriya Kutumb Labh Yojana
महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विशेषतः राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्ता असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या वारसाला 20 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करते.
लाभ कोणाला भेटतो?
Rashtriya Kutumb Labh Yojana Benefits
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्ता असलेल्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्यास हा लाभ देण्यात येतो.राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत वीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येते.त्यासाठी त्या व्यक्तीचे वय १८ ते ५९ च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा आणि कुठे करायचा?
Rashtriya Kutumb Labh Yojana Apply Online
•महाराष्ट्र राज्यातील कोणताही व्यक्ती जो दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असेल अशा सर्व प्रवर्गातील व्यक्तींना ही योजना लागू आहे.
•अर्ज करण्यासाठी अर्जदाराला जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकता.
•दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कर्ता असलेल्या व्यक्तीचे अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर वारसांनी तीन वर्षांच्या आत तहसीलदार,तलाठी किंवा संबंधित तहसीलच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आर्थिक मदतीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
•अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.त्यासाठी येथे क्लिक करा.
हे पण वाचा:- आता आयुष्मान भारत कार्ड काढा 5 मिनिटात तेही घरबसल्या!
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
•मयत व्यक्तीचे आधार कार्ड
•मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
•कुटुंबाचे रेशन कार्ड
•अर्जदाराचे आधार कार्ड
•वारस असल्याचा तलाठी यांचा दाखला
•अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
•मोबाईल नं./ई मेल
•विहित नमुन्यातील अर्ज
मित्रांनो ही महत्वाची माहिती योग्य आणि गरजु व्यक्तीपर्यंत तसेच तुमचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्तीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.आपण नक्कीच ही माहिती गरजु व्यक्तीपर्यंत पोहोचवाल ही खात्री आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.