Salary Of Sarpanch 2023 | तुमच्या गावाच्या सरपंच आणि उपसरपंच यांना किती पगार मिळतो? जाणून घ्या सविस्तर!

Spread the love

Salary Of Sarpanch2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात नुकत्याच 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आहे. ग्रामपंचायतसाठी अनेक ठिकाणी जनतेतून सरपंच निवड करण्यात आली आहे.निवडून आलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांना शासनाकडून मानधन दिले जाते.

सरपंच आणि उपसरपंच यांना शासनाकडून गावाच्या लोकसंख्येच्या आधारे पगार म्हणून आर्थिक मोबदला दिला जातो.सरकारने 2021 मध्ये सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांना शासनाकडून किती मानधन दिले जाते याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहेत.

लोकसंख्येनुसार मिळणार मानधन Salary Of Sarpanch 2023

ज्या गावाची लोकसंख्या 0 ते 2000 आहे अशा ग्रामपंचायत मधील सरपंच यांना 3000 रुपये प्रति महिना तसेच उपसरपंच यांना 1000 रुपये प्रति महिना मानधन दिले जाते.तसेच त्यांना 75 टक्के सरकारी अनुदान म्हणून सरपंच असलेल्या व्यक्तींना 2250 रुपये आणि उपसरपंच असलेल्या व्यक्तींना 750 रुपये दिले जातात.

2001 ते 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत साठी मानधन

ज्या गावाची लोकसंख्या 2001 ते 8000 आहे अशा गावातील सरपंच यांना 4000 रुपये प्रति महिना आणि उपसरपंच यांना 1500 रुपये प्रति महिना मानधन दिले जाते.सरकारी अनुदानाची रक्कम 75 टक्के देखील दिली जाते.सरपंच यांना 3000 रुपये आणि उपसरपंच असलेल्या व्यक्तींना 1125 रुपये अनुदानाची रक्कम दिली जाते.Salary Of Sarpanch 2023

8000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत साठी मानधन

गावाची लोकसंख्या ही 8000 पेक्षा जास्त असेल तर सरपंच असलेल्या व्यक्तींना 5000 रुपये प्रति महिना आणि उपसरपंच यांना 2000 रुपये प्रति महिना मानधन दिले जाते.तसेच 75 टक्के अनुदान देखील दिले जाते.सरपंच असलेल्या व्यक्तींना 3750 रुपये आणि उपसरपंच यांना 1500 रुपये अनुदान रक्कम दिली जाते.

हे पण वाचा:- नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आला का नाही हे चेक करा!

थेट बँक खात्यात जमा होते मानधन

राज्यातील ग्राम पंचायत सरपंच आणि उपसरपंच असलेल्या व्यक्तींना मानधनाची रक्कम ही डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.त्यासाठी सरकारने 2019 साली शासन निर्णय देखील काढला आहे.Salary Of Sarpanch 2023

सरपंच आणि उपसरपंच यांची कर्तव्ये पुढीलप्रमाणे

•ग्रामसभेचे अध्यक्षपद सांभाळणे.
•शासनाच्या योजना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे.
•योजनांची अंमलबजावणी करणे.
•ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची आणि खर्चाची माहिती देणे.
•ग्राम पंचायत मधील विकास कामांची देखरेख करणे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment