SBI Stree Shakti Yojana
संपूर्ण देशातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा केंद्र तसेच राज्य शासनाचा मानस आहे.महिला सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवित असते.अशातच भारतीय स्टेट बँकेने देखील महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.देशातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी भारतीय स्टेट बँक कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
Table of Contents
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील अशा महिला ज्यांना स्वतःचा उद्योग उभा करायचा आहे त्यांना कर्जाचा पुरवठा करणार आहे.ज्या महिला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशा महिलांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.तसेच कर्जाचा पुरवठा अत्यंत कमी व्याज दराने केला जाणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी SBI स्त्री शक्ती योजना(SBI Stree Shakti Yojana) सुरू केली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता,आवश्यक कागदपत्रे तसेच इतर बाबी आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहेत.त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवट पर्यंत वाचणे आवश्यक आहे.
काय आहे योजना?
SBI Stree Shakti Yojana
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी SBI स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे.योजनेच्या अंतर्गत पैशांच्या अभावी व्यवसाय सुरू करण्यासाठी असमर्थ असणाऱ्या महिलांना स्टेट बँक इंडियाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना 25 लाख रुपयांपर्यंत कर्जाचा पुरवठा केला जाणार आहे.यासाठी व्याजदर देखील अत्यंत कमी ठेवण्यात आला आहे.
हे पण वाचा:- आता गूगल पे वरून मिळणार लोन तेही कोणत्याही कागद पत्रांशिवाय !
नियम आणि अटी
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्त्री शक्ती योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तसेच कर्ज मिळण्यापूर्वी महिला ज्या व्यवसायासाठी कर्जाची मागणी करीत आहेत त्या व्यवसायात संबंधित महिलांचा किमान 50 टक्के किंवा त्याहून अधिक भागीदारी असणे आवश्यक आहे.तसेच या योजनेच्या अंतर्गत अर्जदार महिलेला पाच लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज असणार नाही.
आवश्यक कागदपत्रे SBI Stree Shakti Yojana
•अर्जदार महिलेचे आधार कार्ड
•अर्जदार महिलेचे पॅन कार्ड
•पत्त्याचा पुरावा
•व्यवसाय पुरावा
•व्यवसाय प्रकल्प आराखडा
•बँक स्टेटमेंट
•मोबाईल क्रमांक
•पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्ज कुठे करायचा?
ज्या महिला वर्गाला SBI स्त्री शक्ती योजना अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करायचा आहे.अशा महिलांनी आपल्या जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन सदर योजनेची माहिती करून घेणे आवश्यक आहे. तसेच आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या शाखेतून कर्ज घेणार आहेत त्या शाखेत जाऊन आपल्याला अर्ज करावा लागेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.